१. स्वतः स्वतःशीच बडबडण्याचा,
आता कंटाळा यायला लागलाय,
म्हणून तर हा पठ्ठ्या,
आता चारोळ्या व्यायला लागलाय!!
२.बिन विषयाच्या लेखावर,
ही एक बिन विषयाची चारोळी,
शब्दांच्या जंगलातली,
एक फुकट गेलेली आरोळी!!
३. नव्वद टक्के चारोळ्या,
ह्या प्रेयस्यांवरती का असतात?
बाकी जग सोडून,
ह्यांना फक्त मुलीच का दिसतात?
४. मोठा चारोळीकार बनावं,
असा मनात ध्यास आहे,
तेवढ्या चारोळ्या काही सुचत नाहीत,
हाच फक्त त्रास आहे!!
५. चारोळीला विषय हवा,
असा वाचणा-यांचा आग्रह असतो,
माझ्या चारोळीला विषय नसणार,
असा मग माझाही निग्रह असतो!!
६. सगळे जर करतात,
तर माझीही एक चारोळी एका मुलीवर,
तिचे रूप, तिचे डोळे,तिचे बोलणे आठवून
माझे हृदय होते खालीवर!!!!
Saturday, February 24, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
हहजगलो, चाफ्या! आणि क्रमांक ३ तू लिहावीस यापरता विरोधाभास कोणता?
धन्य त्या चारोळया आणि धन्य ते ब्लॉगर
धन्य ह्या कॉमेंट आणि धन्य तो चाफेकर !!
:))
चाफ्याचं एक जाऊ देत रे
त्याची लक्षणं नाहीयेत बरी
पण सतुबा तुमची कशाला
अशी "एक्स्प्रेस डिलिव्हरी"?
एका चारोळीमागे तीन तीन आरोळ्या?
Post a Comment