Tuesday, February 20, 2007

एक फालतू कविता(?)....

कविता करण्यास बसलो आहे
पण करता येत नाही !!

आधी शब्द सापडत नाही,
आणि सापडला तर...
तो हवा तो अर्थ घेत नाही !!

यमके जुळवायची सारी खटपट,
ती जुळत नाहीतच, जुळली तरी....
त्यांची कविता होत नाही! !!

लिहायचं असतं काहीतरी अर्थगर्भ,
शब्दांचं एक घट्ट मिश्रण, ही असली
शब्दांचे बाण हवेत नाही!!

म्हणता म्हणता झाली तीन कडवी(अगदी नावाप्रमाणेच कडू..)
आणि हे चौथं( की चोथा?), तरीही..
हवा तो अर्थ अभिप्रेत नाही!!

4 comments:

Bipin said...

Lay bhari re chaphya...
ha.ha.ja.ga.lo. aahe.
SK prasanna zale asatil....
:D

Rahul Deshmukh said...

कविता वाचून तर तुम्हाला शब्दांचा पत्ता व्यवस्थित सापडलाय असं दिसतंय.

कडू कडव्याची कोटी अगदी जमून आलीये.
लगे रहो.
:)

Shashank said...

bin vishayaachyaa lekhaanantar ek binviShayaachee kavitaa changlee jamalee aahe!

Arvind said...
This comment has been removed by a blog administrator.