Thursday, March 29, 2007

द्वैत.

सकाळी उठल्यापासून "त्या"ची कटकट सुरू होते.९ वाजता क्लास असतो, म्हणून वास्तविक मी चांगला ८ वाजताचा अलार्म लावून ठेवतो.तो बरोबर ८ला वाजतोही. आणि मला जागही येते.ह्या तिन्ही गोष्टी एकदम घडल्याच्या आनंदात मी उठतो आणि खोलीचं दार उघडतो न उघदतो तोच त्याचा आवाज येतो," काय ९ वाजता क्लास आहे ना? मग आत्तापासून उठून काय दिवे लावणार आहेस घोड्या?झोप परत. ८ला उठतोय लेकाचा." ह्या भीषण भडिमारापुढे मी सपशेल शरणागती देतो आणि निमूटपणे कॉटवर आडवा होतो आणि ८:२० चा अलार्म लावतो. आता तसं पहायला गेलं तर ८:२० आणि ८:३० मधे असा कितीसा फरक आहे म्हणा! त्यामुळे अर्थातच मी ८:२०च्या ऎवजी ८:३० ला दचकून उठतो. डोळ्यासमोर instructor चे भयावह मुद्रा तरळते आणि मी ताड्कन जागा होतो आणि पुन्हा एकदा मगाशी बंद केलेले दार उघडतो. ह्यावेळी मात्र तो काही बोलत नाही. ही त्याची मूक संमती समजून मी आन्हिकं उरकायला लागतो. फक्त दात घासून रात्री घातलेली हाफ पॅंट बदलून त्यातल्या त्यात स्वछ बाहेर घालायची पॅंट घालणे ह्या क्रियेला hostelite विद्यार्थ्यांमधे आन्हिकं असंच म्हणतात. मग मी आणि तो बरोबरच क्लासला जायला निघतो. तेही एकाच सायकलवर.क्लासमधे मात्र तो मला त्रास द्यायला येत नाही.मात्र क्लास सुटला की रावजी हजर!

सतत मजा करणं हा त्याचा स्वभाव. मलाही तो त्याच्याबरोबर ओढून नेतो. मी तरी दर वेळी का त्याच्यामागे जातो कळत नाही.कधी कधी मात्र मी बंड पुकारून त्याच्याबरोबर जायचं नाकारतो. तो चिडतो, धुसफुसतो, आणि रागावून निघून जातो. माझाही नाईलाज असतो. काही महत्वाचा अभ्यास संपवणं अतिशय गरजेचं असतं.गेला तर गेला! येईल झक मारत परत! त्याला माझ्याशिवाय दुसरं आहेच कोण! मी त्याच्यशी दिवसभर बोलत असतो. एखाद्या प्रसंगी कसं वागावं, कसं बोलावं ह्यावर तो मला सारखं सुनावत असतो.मलाही त्याचे लेक्चरबाजी अजिबात कंटाळवाणी वाटत नाही. इतकच काय, मुलींशी कसं बोलावं हेही तच मला शिकवतो!तो काय मुलींशी बोलण्यात expert वगैरे आहे अशातला भाग नाही. पण सारखे सल्ले द्यायची सवय!त्याला कोण काय करणार?

रात्री बिछान्यावर पडल्यावर मात्र आमचा हा दिवसभर चाललेला, मनातला संवाद मी संपवतो. 'तो', म्हणजे माझ्याच मनात दडलेला एक दुसरा 'मी' ,आम्ही दोघंही शांतपणे झोपी जातो, उद्या सकाळच्या ८:०० वाजताच्या अलार्म ची वाट बघत!

4 comments:

Unknown said...

मी हजार चिन्तन्नि हे डोके खाजवतो सारख वाटतय

Punit Pandey said...

Hi Prasad,

Your blog has been added into MarathiBlogs.com. I would appreciate if you can also give a link back to MarathiBlogs.com from your blog.

-- Punit

Gayatri said...

मित्रा द्वैतमुखा, तुझ्या सुमुखातून सुक्षेपित होणाऱ्या अनेक सुवचनांचे मूळ या सुलेखातून माझ्या सुध्यानात आले आहे. उदा टिंब थोबाडभंजनाची सुधमकी. स्वत:तील द्वैताचा प्रत्यय घेताक्षणीच 'आपणासारिखें करून सोडावें सकळ जन' या सूक्तीनुसार तू सुवर्तन करावे, यात नवल ते कोणते?

पण कुक्कुटकुलोत्पन्ना, मानववंशातील त्या विशिष्ट गटाशी बोलायला तू शिकवणी लावली आहेस, हे बरिक मुळीच ध्यानात येत नाही हो!

Anonymous said...

it's very nice article...