Thursday, May 27, 2010

आल इज वेल

UPSC ची prelim exam देऊन बाहेर पडलो. डोक्यावरून ओझं उतरलं असं वाटलं. मग वाटलं, की जर हे ओझं वाटतंय तर का करतोय मी हे? हा माझा दुसरा प्रयत्न. पहिल्यामधे मुख्य परिक्षा पास होऊ शकलो नाही. त्याची कारणंही शोधून काढली आणि परत नव्या दमाने दुसरी ईनिंग सुरू केली. कधी कधी वाटतं, UPSC देणं हे जुगार खेळण्यासारखं आहे. जितके हरत जाता, तितके अधिक गुंतत जाता. तसं तर होत नाही ना माझं? माझ्या माहितीतल्या एका मुलाचा हा सहावा प्रयत्न होता. कसं जमतं एवढं? पण जमतं. कदाचित त्यासाठी तुमच्यापाशी असं काहीतरी असावं लागतं, जे तुम्हाला कायम सांगत रहातं "बरोबर चालला आहेस तू.. जात रहा." आमीर खान ३ idiots मधी बरोबर सांगतो " ये दिल को बेवकूफ़ बनाके रखो. आल इज वेल, आल इज वेल". कुणासाठी हे "काहीतरी" एखादी व्यक्ती असते, एखादं पुस्तक असतं किंवा अजून काही.

जेव्हा मी धर्माधिकारी सरांना सांगितलं की मी मुख्य परिक्षा पास नाही झालो, तेव्हा ते म्हटले ," हरकत नाही. आता पूर्ण फोकस ने प्रीलीम दे आणि ह्या अटेम्प्ट मधे क्लीअर होऊनच दाखव. पण तू ठीक आहेस ना? म्हणजे ह्या एका अपयशामुळे खचून गेलेला नाहीस ना?" त्यावर मी म्हटलो, " सर, मी अशा माणसाकडून प्ररणा घेतली आहे, जो व्हिएन्ना च्या रस्त्यावर एक भणंग म्हणून वावरत होता, आणि तिथू्न युरोपातल्या (काही काळापुरत्या तरी) सर्वात शक्तीमान राष्ट्राचा पुढारी झाला. " मी हे उत्तर ठरवून दिलं नव्हतं. ते आपसूक आलं. माझी आपली एक भाबडी श्रद्धा आहे. ज्या माणसाने लहानपणी हिटलर बद्दल वाचलं असेल, तो दुष्ट होऊ शकेल, पण भ्रष्ट होणार नाही. त्याच्याबद्दल माझ्या मनात Harry Potter मधे Ollivander , lord Voldemort बद्दल harry ला जे सांगतो, ते येते ," after all, lord Voldemort did great things.. terrible , yes, but great.."

UPSC चा अभ्यास करताना साध्या साध्या इच्छा पूर्ण करता येत नाहीत. आता मला साधं मित्राकडे २ दिवस बॅंगलोरला जायचं आहे, पण ते सुद्धा शक्य झालं नाही. कधी कधी वाटतं बस्स झालं.आईच्या गावात त्याच्या, बंद करूया आता. पण नाही.. त्याची नशा एकदा चढली की सोडवत नाही. आत्ता नाही इच्छा पूर्ण करता आल्या तरी UPSC झाल्यावर मस्त मजा करू.. हिंडून-फिरून येऊ.. सगळं नीट होईल ’आल इज वेल..’

3 comments:

Anonymous said...

All the best!!!!!

t said...

anand do not change... ever.
tujhya sarkhya dhyeyawedya tarunnachi amhala(yaat parents family desh duniya sagle ale)khooop garaj ahe.

Spruha said...

Wish u a grt luck Prasad..I wish all ur dreams cm true!!